रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे १५ तहसीलदारांना आदेश

आदिवासींना अन्नधान्यापासून वंचित ठेऊ नका !



पेण , दि. १० - लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या विशेषतः आदिवासी बांधवांची फरपड होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १५ तहसिलदारांना सक्त आदेश देत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी एकही आदिवासी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाहीत याची ग्वाही दिली. 
        तारा येथीय युसुफ मेहरली सेंटरच्या सामाजिक कार्यकर्त्यानी नुकतीच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊनमुळे मजुरीसाठी जिल्ह्याबाहेर गेलेले हजारो आदिवासी आपल्या मूळगावी परतले आहेत. परंतु सध्यस्थितीत त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही परिणामी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सुरु झालेल्या अन्नधान्यापासून ते वंचित राहतील आणि कोरोना प्रमाणेच भूकबळीची संख्या वाढू शकेलअशी विदारक परिस्थिती मांडताच जिल्ह्यादिकारी यांनी तात्काळ सर्व तहसीलदाराना आशा कुटुंबियांचा शोध घेऊन प्राधान्याने कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल आपल्याला पाठवावा असेही निर्देश त्यांनी दिले आहेत . 
          याकरिता एक आठवड्याचे  विशेष अभियान राबवावे आणि ज्या कातकरी कुटुंबीयांकडे शिधापत्रिका नाही त्याची पडताळणी करून त्यांच्याकडून अर्ज भरून व  आधार नंबर उपलब्ध करून पिवळी शिधापत्रिका देण्यात यावी. असेही निर्देश निधी चौधरी यांनी तहसीलदारांना दिले आहेत.