लॉकडाऊन उठविण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीवर तर्कवितर्काना उधाण


पेण ,दि. १४- राज्यात कोरोना महामारीचा कहर वाढत असताना, अनेक भागात हॉटस्पॉट म्हणून घोषित केले जात असताना, राज्याच्या अनेक भागात कोरोना संसर्गाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना, राज्य सरकारची चिंता वाढली आहे. म्हणूनच त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्याला पुढील धोक्यापासून वाचविण्यासाठी ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली. तर आरोग्य साधने वाढविण्यावर भर दिला आहे. नव्याने खास कोरोना रुग्णालयांची आगाऊ उभारणी करण्यात येऊ लागली आहे. अशा पार्श्वभूमीवर जो रायगड जिल्हा आधीच रेड झोनमध्ये सामाविष्ट झाला आहे. त्याचा प्रादुर्भाव सध्या पनवेल व उरणपर्यंतच सीमित आहे. त्याची वाढ पुढे सरकू नये याची दक्षता घेऊन नव्या उपाययोजना सरकारला सुचविणे लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित होते. म्हणजे हा जिल्हा लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये निघू शकला असता. पण हा विचार केरण्याऐवजी जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे  दोन आमदार रवीशेठ पाटील व प्रशांत ठाकूर यांनी चक्क लॉकडाऊन उठविण्याची मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 



       


        लोकांच्या जीवाची काळजी करण्याऐवजी चक्क त्यांच्या रोजगाराची अचानक चिंता करून अशोक-व्यवसाय सुरु करण्याची भूमिका घेतल्याने जनतेमध्ये विविध तर्कवितर्काना चांगलेच उधाण आले आहे. ही मागणी खरोखरच लोकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून करण्यात आली आहे की उधोजकांच्या मदतीसाठी उचललेले पाऊल आहे. आशा चर्चा आता घडू लागल्या आहेत. 
          लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या उधोजकाना आपल्या नफ्याची चिंता सतावू लागली आहे पण सर्वसामान्य जनतेला मात्र आपल्या जीवाची काळजी वाटू लागली आहे. दरम्यान आज पंतप्रधान मोदी यांनी यापुढचा लॉकडाऊन पहिल्यापेक्षा अधिक सक्तीने व कठोर पालन करण्याचे आवाहन जनतेला केल्याने या आमदारद्वयींची भूमिका अडचणीत आली आहे.