परदेश प्रवास करणारांची भीतीही गेली विरून .


पेण, दि . १०- रायगड जिल्ह्यातील  हजारो लोक परदेशात नोकरीनिमित्त आहेत. दक्षिणेकडील तालुक्यांतील  आखाती देशातही मोठ्या संख्येने लोक कामानिमित्त आहेत. कोरोनाची भयावह  परिस्थिती उद्भवल्यावर जगभरातील लोक आपापल्या मायदेशी परतले. परंतु ते तेथील संसर्ग घेऊन परंतु लागल्याने प्रत्येक देशांनी सीमा सिल केल्या. त्यामुळेच अर्थातच ही खबरदारी भारतानेही घेतली. परंतु आंतापर्यंत देशात आलेल्या लोकांची चिंता सरकारला सतावू  लागली. हीच  चिंता रायगड प्रशासनाला देखील लागून राहिली होती. पण सुदैवाने ती तशीच विरून गेली. 
         रायगडात परदेशी प्रवास करून आलेले १७१८ जण आढळून आले. त्यापैकी तब्बल १४०९ जणांना १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. २७१ जण तर घरामध्ये अलगीकरणात राहिले. त्यातील २१ जण शासकीय अलगीकरण कक्षात राहिले. पण यामध्ये फारशी लागण झालेले रुग्ण विशेष आढळून आले नाहीत. यापैकी जिल्ह्यातून कस्तुरबा रुग्णालयात तपासणीकरिता ३२३ जणांना पाठविण्यात आले होते पण  ३६ जणांची तर तपासणीच न करण्याचा  निर्णय घेण्यात आला. आणि ज्या २८७ जणांची तपासणी झाली त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. आणि सगळ्यानाच मोठा दिलासा मिळाला. 
           या संकटात रायगडच्या जनतेने संयमाचे, शिस्तीचे आणि  प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत जे दर्शन घडविले त्याबद्दल ते धन्यवादास पात्र आहेत. आपले पारंपरिक सारे सण, उत्सव, यात्राच नव्हे तर ठरलेली लग्न देखील रद्द केली.  हे सहकार्य अत्यंत महत्वाचे ठरले.